विद्यार्थी आणी शिक्षकांनी एकत्र येत अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केले ; उभे राहुन दिला 75 चा आकार
चिखलठाण (बातमीदार)
हर घर तिरंगा मोहीमेबाबत चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूल मध्ये 75 अंकामध्ये विद्यार्थी उभे राहून अनोख्या पद्धतीने जाणिव जागृती करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे.

या निमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर होत आहे. अशाच प्रकारे चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूल मध्ये 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा जागर शाळेतील 75 विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी एकत्र येत हा उपक्रम राबविला.

या वेळी सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात स्कूल मधील सर्व शिक्षक व इतर विद्यार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते