रस्त्याच्या कामात आंधळे दळतय आणि कुत्रे पीठ खातय असा प्रकार ; भरपावासात काम सुरु
करमाळा समाचार
करमाळा कोर्टी रस्त्याचे काम सुरू असल्याने रंभापुरा परिसरात छोटा पूल बांधण्यात येत आहे. त्या ठिकाणी पुल पूर्ण झाल्यानंतर पाणी साठ्याच्या अडचणी दूर होणार आहेत. तर करमाळा राशीन हा अत्यंत रहदारीचा रस्ता असून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक या रस्त्याने होणार आहे. परंतु बऱ्याच दिवसांनी आज पाऊस झाला आणि त्या पावसातही सदर पुलाचे काम सुरू होते. हे पाहून सदर कामात किती काळजीने ठेकेदार काम करत आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे सदरचा प्रकार हा आंधळे दळतोय आणि कुत्र पीठ खाते असा होऊ लागले आहे.

बरेच दिवसांपासून करमाळा कोर्टी तसेच करमाळा आवटी या रस्त्याचे काम सुरू आहे. वारंवार वेगवेगळ्या तक्रारी या रस्त्याच्या कामानिमित्त येतच होत्या. परंतु आता तर हद्द झाली भर पावसात या ठिकाणी दिवसभर काम करत असल्याचे दिसून आले. सदरचे काम सिमेंटचे चालू असून या ठिकाणी मोठा पूल त्या भागात बांधला जाणार आहे. त्यावर मोठ्या वाहनांची वाहतुक होणार आहे. अशाने ते काम भक्कम होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज दि २७ गुरुवारी दिवसभर करमाळा शहरात पावसाने सतत धार चालू ठेवली होती. तरीही अशा परिस्थितीत कामगारांनी पावसातही काम सुरू ठेवल्याने त्या पुलाची प्रत ढासळणार हे नक्की आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून काम योग्य पद्धतीने होते का हे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्या कामाकडे ठेकेदारांनी नेमुन दिलेल्या कर्मचाऱ्या व सिमेंट मिक्स करण्याच्या मिक्सर शिवाय कोणीही तेथे दिसून आले नाही. तो भराव त्या पुलाच्या कामांमध्ये टाकला जात होता व पावसाने त्याची प्रत ढासळणार असे दिसत होते.