आदर्श माता पुरस्काराने सुजाता झोळे यांचा सन्मान
करमाळा समाचार -संजय साखरे
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे यांच्या मातोश्री सुजाता संभाजी झोळे यांना राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त आदर्श माता या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सुजाता झोळे यांचे समजासाठी असलेले काम पाहून हा सन्मान करण्यात आला आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते हा सन्मान आज करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सह आयुक्त संदीप कदम होते. झोळे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना राजकीय, सामाजिक तसेच अनेक स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

यावेळी अखिल भारतीय शिवजयंती अध्यक्ष विकास पासलकर, मराठा सेवा संघाचे मारुती सातपुते, कैलास वडघुले, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.