पत्रकार कट्ट्यात झालेल्या चोरीतील संशयीतांना अटक ; बारा तासात लागला तपास
करमाळा समाचार
करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी कोणताही सुगावा व कोणतीही अधिक माहिती नसताना करमाळा पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणातील चार संशयीतांना ताब्यात घेतले आहे. काल पत्रकार कट्टा येथे कार्यालयाचे शटर उचकटुन चोरीतुन कंप्यूटर चोरीची घटना समोर आली होती. त्यानंतर त्या घटनेचा तपास केल्यानंतर चार संशयित ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई केवळ बारा तासात केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

करमाळा तालुक्यात बऱ्याच दिवसापासून छोट्या-मोठ्या चोऱ्या घडत होत्या. पण त्याचे संशयित हाती लागत नव्हते अशाच प्रकारची चोरी बागवान नगर, मेन रोड वरील, जैन मंदिर, दत्त मंदिर अशा ठिकाणी घडल्या होत्या पण चोर मिळून येत नव्हते. पण नुकतेच काल पत्रकार कट्टा येथील चोरी उघडकीस आल्यानंतर याचा शोध घेण्यात आला. यावेळी काही युवक हे संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्यांच्याकडून कम्प्युटर व इतर साहित्य असा एकूण 46 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी आकाश उर्फ बाळा संजय घाडगे वय २३ फंड गल्ली, अजय उर्फ किशोर घोडके वय २१ सिद्धार्थ नगर, रोहन नंदकुमार शिंदे वय २२ रा. सिद्धार्थ नगर, केदार उर्फ मोन्या सुभाष कुसकर वय १९ फंड गल्ली आदि संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे, हवालदार संतोष देवकर, अजित उबाळे , नाईक चंद्रकांत ढवळे, पो. कॉ. तौफिक काझी, अमोल जगताप, सोमनाथ जगताप, सोमनाथ कांबळे, म. पो. कॉ. शितल पवार आदिच्या पथकाने तपास लावला आहे.