करमाळ्याचे प्रसिद्ध व्यापारी रच्चा यांचा संशयास्पद मृत्यु ; आत्महत्या असल्याबाबत संशय
करमाळा समाचार
करमाळा शहरातील कृष्णाजी नगर भागात राहणारे व्यापारी श्रीकांत गणपत रच्चा (बाबुशेठ) रा. कृष्णाजी नगर करमाळा. यांच्या राहत्या घरी गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे. तरी करमाळा पोलिसांच्या वतीने पुढील तपास करण्यात येत आहे. तर रच्चा यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

करमाळा शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच बांधकाम व्यवसायिक बाबुशेठ राजच्या हे सर्वत्र परिचित होते. त्यांचा राहत्या घरात सकाळी बाराच्या सुमारास मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बाबू शेठ यांच्या घरातील इतर सर्व बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरी बाबुशेठ होते. तर कामगार काही कामानिमित्त त्यांना शोधत रूम कडे गेला. त्यावेळी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बाबुशेठ मिळून आले. यावेळी त्यांनी इतरांना या बाबत सांगितले त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात फोन करुन बोलावले आहे.