साडे येथे युवकाचा संशयास्पद मृत्यु ; खुनाचा संशय
करमाळा समाचार
तालुक्यातील साडे येथे एका 18 वर्षीय मुलाचा मृतदेह मिळाला आहे. संबंधित मृतदेहावर गंभीर जखमा आढळल्या असून त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल्यानंतर मयत घोषित करण्यात आले आहे. सदरचा प्रकार हा संशयास्पद असून अज्ञात कारणाने खून झाल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. तर करमाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

रोहित काळे असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. सदरचा तरुण हा शेतीमध्ये मजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत होता. काल रात्री जेवण्यासाठी माघारी येतो म्हणून गेलेला रोहित परत घरी आला नाही. त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळून आला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी करमाळा पोलीस ठाण्यात संबंधित प्रकाराबाबत माहिती दिली. यावेळी करमाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले व पुढील तपास करीत आहेत.
