पोथरे येथे दिवाळी पाडव्यानिमित्त स्वरदिप दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा-प्रतिनिधी
पोथरे ता. करमाळा येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दिवाळी पाडव्यानिमित्त स्वरदिप दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या कार्यक्रमात संदिप पाटील प्रस्तुत भव्य संगीतमय पहाट ही भावगीत, भक्तिगीत, चित्रपट गितांची दर्जेदार सुरेल मैफील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वादकाच्या साथीने संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक २१२१ दिव्यांचा भव्य दिपोत्सव सोहळा शनि मंदिर पोथरे येथे पहाटे 5.00 वाजता संपन्न होणार आहे.

या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजक खेळ देखील संपन्न होणार आहे. तरी सदरच्या कार्यक्रमाला करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, पोलीस निरीक्षक करमाळा रणजीत माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थाध्यक्ष गणेश करे-पाटील, भारतीय जैन संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप शेठ बलदोटा इ. प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संपुर्ण कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील वादन, गायन, निवेदन या क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार असुन, पोथरे तसेच पंचक्रोशी व तालुक्यातील सर्वच संगीत रसिकांना संगीताच्या मैफिलीची एक उत्तम पर्वणी लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहुन स्वरदिप दिवाळी पहाट कार्यक्रमाचे शोभा वाढवावी. व सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे. अशा प्रकारचे आमंत्रण समस्त पोथरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

