बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करा
प्रतिनिधी – संजय साखरे
करमाळा तालुका उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. करमाळा तालुक्यातील कारखान्या बरोबर शेजारच्या पुणे व नगर जिल्ह्यातील साखर कारखाने ही या भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस नेतात .सध्या ऊसतोड हंगाम चालू असल्याने उसाचे वाहतूक मोठ्या प्रमाणावर ट्रक व ट्रॅक्टर द्वारे चालू आहे.
यापैकी अनेक ट्रॅक्टर हे रात्री-अपरात्री ऊस वाहतूक करत असताना मोठ्या प्रमाणावर टेप रेकॉर्ड चा कर्णकर्कश आवाज सोडत आहेत. ाशिवाय अनेक ट्रॅक्टरच्या ट्रेलरला रिफ्लेक्टर बसवलेले नाहीत, त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना ट्रेलर अजिबात दिसत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय अनेक ट्रेलर हे वीणा पासिंग आहेत.

त्यांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पासिंग झालेले नाही. ज्या टेलरची ऊस वाहून नेण्याची क्षमता आठ टन इतकी आहे ते 14 टन इतका प्रचंड पाऊस भरतात. सरासरी दोन्ही टेलरचे वजन 30 ते 32 टनापर्यंत जात आहे. जास्त ऊस वाहून नेण्यासाठी वाहनचालकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे अगोदरच खराब झालेल्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
याशिवाय रात्री-अपरात्री रिकामे होऊन परत येत असताना वेगाने वाहन चालवण्याची त्यांच्यात स्पर्धा लागलेली असते. यापैकी अनेक ट्रॅक्टर ड्रायव्हर कडे वाहन चालवण्याचा परवाना नाही .पंधरा ते सोळा वर्षे वयोगटातील ही मुले अतिशय कमी पगारात काम करतात. म्हणून वाहनमालक त्यांना कामावर ठेवत आहेत.

रात्री-अपरात्री दिवसा कधी वाहन भरून जाताना किंवा येताना हे चालक फार मोठ्या प्रमाणावर टेपचा कर्णकर्कश आवाज सोडतात. त्यामुळे त्यांना पाठीमागून आलेले वाहन कळत नाही. पाठीमागून येणाऱ्या वाहनाने कितीही हॉर्न वाजवला तरी त्याचा आवाज टेपरेकॉर्डर मुळे त्याला ऐकू येत नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याशिवाय ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात केले डेकोरेशन व हेडलाईट यामुळे ड्रायव्हरला समोरचे दिसत नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अतिशय अस्सल व इरसाल गाणी लावून हे अल्पवयीन ड्रायव्हर मुलं मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक शांततेचा भंग करत आहेत. गावातील लोकांनी त्यांना विचारले तर त्याचे मालक संबंधित ठिकाणी येऊन अरेरावीची भाषा करतात .यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. याचा त्रास लहान मुले, व वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला प्राथमिक व माध्यमिक शाळा ,दवाखाने सार्वजनिक वाचनालय आहेत. त्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावणाऱ्या वाहनांवर पोलिस प्रशासनाने व जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने व संबंधित कारखान्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनते मधून समाधान निर्गुडे व सुहास साखरे यांनी केली आहे.