करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वकीलाच्या घरी घरफोडी दोन किलो सोने चोरल्याच्या चर्चाना उधाण ! ; नेमके काय घडलय ?

करमाळा – विशाल घोलप

एका घराच्या पाठीमागून पडीक जागेतून घराला भगदाड पाडून घरात प्रवेश केला व चोरट्यांनी घरातील रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत. याप्रकरणी दिवसभर करमाळा शहरातभर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. सदरच्या ठिकाणाहून तब्बल दोन किलो सोने चोरीला गेल्याची माहिती गावात वेगात पसरली व ठिकठिकाणी त्यावर चर्चा घडू लागल्या. वास्तविक पाहता तसे काही घडले नसल्याचे तक्रारदाराच्या तक्रारीतुन दिसून आले आहे.

घराच्या भिंतीस भगदाड पाडून घरातील दोन लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार शहरातील मारवाडी गल्ली परिसरात घडला आहे. सदरचा प्रकार दि ५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा ते साडेतीन च्या सुमारास घडला आहे. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय आहे …
याप्रकरणी दीपक उमेदमल कटारिया (वय ६१) रा. मारवाड गल्ली ता. करमाळा यांनी करमाळा पोलिसात तक्रार दिली आहे. कटारीया हे करमाळा कोर्टात वकील म्हणून काम पाहतात. तर ते दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून बाहेर गेले होते. या दरम्यान अनोळखी व्यक्तीने घराच्या पाठीमागील बाजुने भिंतीस भगदाड पाडून आत प्रवेश केला व लोखंडी कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये रोख चोरून नेले आहेत. यामध्ये आणखी काय गेले आहे का अद्याप स्पष्ट नसले तरी ते पोलिस तपासात समोर येईल.

ads

सदरची माहिती करमाळा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी संबंधित ठिकाणी पथक पाठवले. यापूर्वीही याच परिसरात एक चोरी झाली होती. ती करमाळा पोलिसांनी २४ तासाच्या आत उघडकीस आणली होती. आता पुन्हा एकदा त्याच भागात चोरी झाल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेचा पुढील तपास विनायक माहूरकर हे करीत आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE