शिक्षकांना ‘या’ मोहिमेअंतर्गत कोविड 19 सर्वेक्षण ड्युटी देण्यात येऊ नये
करमाळा – करमाळा समाचार
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटान विंग करमाळा वतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शिक्षकांना कोविड 19 सर्वेक्षण ड्युटी देण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन आज तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले.

प्रोटान संघटनेचे निवेदन तहसीलदार यांच्या वतीने श्री शांताराम किरवे नायब तहसीलदार यांनी स्वीकारले.

याप्रसंगी निवेदन देताना प्रोटान सोलापूरचे जिल्हा सचिव विश्वनाथ सुरवसे, नागेश हेळकर, बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक आर आर पाटील, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, कार्याध्यक्ष कय्युम शेख, सहसचिव जावेद मणेरी, राष्ट्रीय घुमंतू जनजाति मोर्चाचे जिल्हा संयोजक दिनेश माने, कार्याध्यक्ष विनोद हरिहर, बहुजन मुक्ती पार्टी चे तालुका अध्यक्ष दिनेश दळवी आदिजन उपस्थित होते.