शिवकाळामधील विधी रितीरिवाजाप्रमाणे सोहळा संपन्न ; तालुक्यातील राजेभोसले घराण्याला मान
करमाळा समाचार
किल्ले रायगडावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. हा सोहळा श्री शिवराज्याभिषेक सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने अभूतपूर्व सोहळ्यात शिवकाळामध्ये ज्या विधी रितीरिवाजाप्रमाणे पूर्ण झाल्या.


त्याचप्रमाणे विधी करण्याचे नियोजन यावर्षी करण्यात आले या सोहळ्याची सुरुवातीची प्रथम विधीवत गणेश पुजन, देवदेवतांच आवाहन,कलश पुजन, वरुणराजा व इंद्रदेव पुजन जिंतीकर राजेभोसले घराण्याचे श्रीमंत सौ.सविताराजे भोसले सरकार व युवराज पृथ्वीराज शहाजीराव राजेभोसले यांचे मानाने झाली.
यावेळी गागाभट्ट व बाळभट्ट या सन्मानिय पुहोहितांचे वंशज आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांचेकडून शिवकालीन गागाभट्ट हस्तलिखित राज्यभिषेक मंत्र मंत्रोच्चारात विधीवत पूजन करण्यात आले.