करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लोकांच्या सहनशीलतेचा बांध फुटून आता डोक्यावरून पाणी वाहू लागले !

करमाळा समाचार


लोकांच्या सहनशीलतेचा बांध फुटून आता डोक्यावरून पाणी वाहू लागले आहे अशी परिस्थिती करमाळा तालुक्यातील रखडलेल्या पुलाच्या कामाची झाली आहे. आक्टोबर २०२२ मध्ये करमाळा गुळसडी रस्त्यावरील पांड ओढा येथील पुलावरून पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्यानंतर वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही अद्यापही पुलाचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसात सदरचा पूल पुन्हा एकदा वरून वाहत होता.

करमाळा शहरातील ठिकठिकाणी ओढ्या नाल्याला पाणी आल्याने पाणी रस्त्यावर पोहोचले व नागरिकांच्या रस्त्याची ये – जा बंद झाली. पण पर्यायी मार्ग असल्यामुळे वेगवेगळ्या भागातून नागरिक शहरातून मार्ग काढू शकतात. पण ग्रामीण भागात जाण्यासाठी जेव्हा एकच मार्ग असतो त्यावेळी जीव मुठीत घेऊन सदरच्या नागरिकांना प्रवास करावा लागत असतो. ही बाब प्रशासनाला माहीत असतानाही आतापर्यंत गुळसुडी भागातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असतानाही त्या रस्त्यावरील पांडओढा पुल अदापही दुरुस्त किंवा त्याची उंची वाढून नवीन बांधकाम केलेले नाही.

मागील २ वर्षापासून प्रशासकीय अधिकारी केवळ काम मार्गी लावू अशा आश्वासन देत आहेत. पण अद्यापही काम मात्र पूर्ण होताना दिसत नाही. लोकांनी जोपर्यंत एखादे आंदोलन करत नाही तोपर्यंत या लोकांना जागही येत नाही अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी लोकांनी आंदोलने करायचे का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सदरच्या कामांमध्ये लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःहून लक्ष देणे गरजेचे आहे. मागील वेळी संबंधित व्यक्ती वाहून गेला त्यावेळी तात्पुरते आश्वासनांची खैरात वाटण्यात आली. पण पुढे काय आजही तीच परिस्थिती असेल तर प्रशासन व वेगवेगळी आश्वासन देणारे पुढारी काय करतेत आता प्रश्न उपस्थित होत आहे.

politics

याशिवाय शहरातही ओढे पुर्ण भरुन वाहिल्याने रस्त्याला नदिचे स्वरुप आले होते. तर फिसरे गौडरे रस्त्यावरही हीच स्थीती असल्याने युवासेना अध्यक्ष शंभुराजे फरतडे यांनी त्याठिकाणी विडिओ चित्रण करुन नाराजीही व्यक्त केली. शिवाय संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालणाऱ्या अधिकारी व पुढाऱ्यांचा निषेधही केला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE