पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रचंड गर्दीमध्ये दत्त पेठ येथील दत्त मंदिरातील कार्यक्रम संपन्न ; तालुकाध्यध्य संतोष वारें नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा समाचार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी मुंबईत व्हर्चुअल रॅली काढण्यात अली होती. एका सभागृहात वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण निवडक जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आले होते. करमाळा तालुक्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सकाळी १० ते दुपारी 3 या वेळेत दत्त पेठ येथिल दत्त मंदिरात शरदचंद्रजी पवार प्रेमींसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यासाठी १० फूट बाय २० फूट साईजच्या एल.ई.डी.स्क्रीनवर सर्वांना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम पाहण्यासाठी करमाळा तालुक्यातील पवार प्रेमींनी गर्दी केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य , फ्रंटल व सेलचे तालुकाप्रमुख , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे व शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अरुण काका जगताप, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन चवरे, मा. जिल्हा उपाध्यक्ष विनय ननवरे, नगरसेवक अतुल फंड, महिला जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती साखरे महिला जिल्हा उपाध्यक्षा विजयमला चवरे, महिला तालुकाध्यक्षा नलिनी जाधव, शहराध्यक्षा राजश्री कांबळे, महिला नेत्या सविता शिंदे, साधना ताई खताळ, एलिझाबेथ असादे मॅडम, लुंगारे मॅडम, युवा नेते अमीर तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब पवार, उपाध्यक्ष शरद नेटके, सरचिटणीस समाधान शिंगटे, मा. युवक जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे पाटील, सचिन नलवडे, श्रीकांत साखरे, नितीन झिंजाडे, धनंजय ढेरे, केतन कांबळे, अभिषेक पाटील, औदुंबर नलवडे, महेश मोरे, पप्पू शिंदे, काशीनाथ डिसले, विकास सरडे, रामचंद्र नलवडे, विकी सरडे, शिवाजी जाधव, उपसरपंच अनिल पवार, पप्पू हिरगुडे, करण सरडे व तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.