लोकसभा निवडणुक जनतेनेच हातात घेतलीय ; इंडिया आघाडी मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद
करमाळा समाचार
तालुक्यातील जनतेनेच तुतारी उचलून धरण्याची ठरवल्याने ठीक ठिकाणी फक्त तुतारीचा जल्लोष ऐकायला मिळत आहे. तर नुकताच इंडिया आघाडीचा नालबंद मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित मेळाव्यात आलेल्या गर्दीवरून मोहिते पाटील यांना मिळत असलेला प्रतिसाद हा उच्च कोटीचा असल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक मोठे नेते जरी युतीच्या बाजूने असतील तरी जनतेने मात्र वेगळेच ठरवल्याचे यातून दिसून येत आहे. सहजासहजी कुठेही न जाणारे लोक आता तुतारीच्या प्रचारासाठी स्वतःहून पुढे येऊ लागले आहे.

मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या सभा संपन्न होत आहेत. तर अनेक ठिकाणी अजूनही सभांचा सपाटा सुरूच आहे. मोहिते पाटील तसेच निंबाळकर यांच्या परिवारातील महिलाही मैदानात उतरलेल्या दिसून येत आहेत. तर गावोगावी वैयक्तिक भेटीगाठी घेऊन प्रचारात रंगत वाढवत आहेत. अशा परिस्थितीत गावागावातून मिळणारा प्रतिसाद आता गर्दी व सभांनाही दिसू लागला आहे. सुरुवातीला लोकांनीच हातात घेतलेली निवडणूक आता पुढेही लोकच घेऊन जात असताना दिसून येत आहे.

करमाळा येथील नालबंद मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याची दिसून आले. या ठिकाणी तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील लोकांनी स्वतःहून हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या मेळाव्यात एकही स्टार प्रचारक नेता नसताना संपूर्ण कार्यालय तर भरलेच होते. शिवाय कार्यालयाबाहेर ही मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती. सदर ठिकाणी उपस्थित लोक उन्हाचा पारा चढलेला असतानाही उपस्थित मान्यवरांचे मनोगत ऐकण्यासाठी थांबून राहिले आहेत. यावरून लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
सदरचा मेळावा प्रा. रामदास झोळ यांच्या अध्यक्षतेखाली, कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष दशरथ कांबळे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहू दादा फरतडे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, नगरसेवक संजय सावंत, तालुका संघटक शिवसेना प्रवीण कटारिया, शिवसेना नेते संजय शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा अध्यक्ष गणेश मंगवडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयूर यादव, दत्तकला शिक्षण संस्था सचिव माया झोळ, कुर्डूवाडी चे उपनगराध्यक्ष संजय टोणपे, युवा सेना तालुकाप्रमुख महिला वैष्णवी साखरे यांच्यासह विविध गटातटाचे मान्यवर उपस्थित आहेत. विशेष म्हणजे सर्वजण एकाच व्यासपीठावर इंडिया आघाडी म्हणून आपली ताकद दाखवून देत आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिवसेना नेते शंभूराजे फरतडे यांनी केले.