पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी जलदिंडी उद्या कुर्मग्रामात
करमाळा समाचार -संजय साखरे
सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या जलदिंडी चे आज आळंदी जिल्हा पुणे येथून प्रस्थान होणार असून भीमा नदीतून प्रवास करत ती जलदिंडी उद्या करमाळा तालुक्यातील हनुमान जन्मभूमी कुर्मग्राम ( कुगाव ) येथे येणार आहे.

आज सकाळी आळंदी येथून श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली चे दर्शन घेऊन जलदिंडी मार्गस्थ होणार आहे .या जलदिंडीतील वारकरी भक्तांचे भीमा नदी मार्गे हनुमान जन्मभूमीत उद्या सकाळी ठीक ११:०० वाजता कोकरे आयलँड कूर्मग्राम येथे आगमन होणार आहे.
या जलदिंडीची कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून आठवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये जलदिंडी प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. या जलदिंडीचे उद्या समस्त कुगाव ग्रामस्थ व चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबुराव सुराणा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती कोकरे आयलँड चे मार्गदर्शक श्री धुळा भाऊ कोकरे यांनी दिली.
