सभापती निवडीत चमत्कार घडणार की निघणार फुसका बार ; दि ९ रोजी निवड
करमाळा समाचार
पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी ऐनवेळी तक्रार मिळाल्यानंतर सभापती निवड रद्द करण्यात आली. पुढे सात दिवसानंतर ही निवड घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार दिनांक 9 रोजी ही निवड होणार आहे. तक्रार केलेले पंचायत समिती सदस्य एडवोकेट राहुल सावंत यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 9 तारखेच्या निवडीवरून सर्वांना उत्सुकता आहे.

निवड प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी बाकी असताना सावंत यांनी त्याठिकाणी नोटीस वेळेत न मिळाले चे कारण करून निवड प्रक्रिया थांबली होती. तर आपण काहीतरी चमत्कार करून दाखवू शकतो असेही बोलून दाखवले होते. पण आता निवडीसाठी दोन दिवस शिल्लक असताना तालुक्याच्या राजकारणात वेगळे बदल तरी अद्याप दिसून आलेले नाहीत. पाटील गटाकडून सदस्य आजही अतुल पाटील यांच्या बाजूने ठाम आहेत. तर इतर गटातील सदस्यही पाटील गटाकडे जाऊन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या नऊ तारखेला चमत्कार होण्याऐवजी विरोधकांची नाचक्की होण्याची शक्यता बळावली आहे.

सभापतीपदी विराजमान होण्यासाठी मुबलक संख्याबळ नसताना शिंदे गटाकडून निवडीला विरोध करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ही यापूर्वी अतुल पाटील यांनी केलेला आहे. नेमके शिंदे गटाकडून काही चमत्कार होण्याची शक्यता आहे. का फुसका बार उडणार आहे. याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.