करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

महाविकास आघाडीकडुन माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव जवळपास निश्चित !

करमाळा समाचार

लोकसभा निवडणुका नंतर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. तर करमाळा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तर करमाळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील हेच उमेदवार असतील असे जवळपास निश्चित झाले आहे. नुकतीच त्यांनी ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार यांचीही भेट घेतली.

करमाळा विधानसभा मतदारसंघात भाजपा व शिवसेना एकत्र असताना शिवसेनेला सदरची जागा मिळत असे. तर राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यामध्ये करमाळा ही जागा राष्ट्रवादीला दिली जात होती. तर आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्र आल्याने ही जागा कोणाला जाईल हा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये करमाळा तालुक्यात माजी आमदार नारायण पाटील यांचे पारडे जड असून विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे राहील अशी शक्यता दिसून येत आहे.

politics

लोकसभा निवडणुका नंतर सध्या मतदार संघामध्ये आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जात असताना करमाळा तालुक्यात जाहीरपणे माजी आमदार नारायण पाटील हेच उमेदवार असतील असे मोहिते पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कडून माजी आमदार नारायण पाटील यांना विधानसभेचे तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय यापूर्वी माजी आमदार पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते त्यावेळीही त्यांनी करमाळ्यात राष्ट्रवादीचा गड जिंकायचा आहे असा आदेश दिला आहे.

तर नुकतीच खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार नारायण पाटील व देवानंद बागल यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. येणाऱ्या काळात सदरची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या कडे राहण्याची शक्यता आहे व त्यामधून नारायण पाटील यांच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे आता महायुती कडून कोणता उमेदवार पाटील यांच्यासमोर उभा असेल याकडे लक्ष लागून राहील.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE