वाळु चोरांवर कारवाई करण्याआधी पळाले ; कारवाईची मागणी
करमाळा – विशाल घोलप
प्रशासन निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्याचा फायदा उचलत वाळू चोर रात्रीच्या वेळी बिटरगाव येथील सिना नदी पात्रातून वाळू चोरी करत असल्याबाबत करमाळा समाचार च्या माध्यमातून वृत्तपसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित ठिकाणी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यावेळी माहिती वाळू चोरांना मिळताच त्यांनी पलायन केले आहे. सदर ठिकाणचा पंचनामा करून कारवाई करण्याचे नियोजन सुरु आहे.

मागील काही दिवसापूर्वी या ठिकाणी वाळू चोरी होत असल्याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यावेळीही अशाच प्रकारे बातम्या प्रसिद्ध झाल्यावर कारवाई करण्यात आली होती. त्या ठिकाणचा पंचनामा केला मात्र पुढे काहीच झाले नाही. त्या पंचनाम्याचे काय झाले ? याची माहिती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे फक्त पंचनामा करून भागणार आहे का, संबंधितांवर कारवाई कधी हा प्रश्न आहे. तर काही अधिकारी अशा वाळू चोरांना पाठीशी घालतात अशा तक्रारीही ग्रामस्थांमधून केल्या जात आहेत.
