उजनीचे सोळा दरवाजे उघडले ; नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी -संजय साखरे

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आज सकाळी जवळपास एकशे दहा टक्के भरले असून धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल रात्री पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणात दौंड येथून दहा हजार च्या पुढे विसर्ग येत आहे. त्यामुळे आज सकाळी उजनीचे सोळा दरवाजे उघडून वीस हजार क्युसेकने पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

याशिवाय धरणातून मुख्य कालवा व भीमा-सीना बोगद्यातुन ही पाणी सोडले असून हा विसर्ग जवळपास नऊशे इतका आहे.
उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी व नीरा नदी पात्रातून येणारे पाणी यामुळे नीरा नरसिंगपूर येथे भीमा नदीचा विसर्ग 24 हजाराच्या दरम्यान गेला आहे.
*आश्चर्यकारक-* सरपडोह गावाने कामातुन करुन दाखवले. केलेल्या कष्टाला फळ मिळु लागले आहे. पाणी फाऊंडेशनमुळे बदल घडत आहेत. ते आता पटु लागले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे व सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पात्रात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी धरणाच्या खालील भीमा नदीच्या काठी असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.