राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये कुंभेज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्वल असे यश
करमाळा समाचार
गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये कुंभेज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले त्याबद्दल कुंभेज ग्रामस्थांच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे गावांतर्गत मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी गावातील अनेक माता प पालक उपस्थित होते .

तसेच राष्ट्रीय खो खो पंच म्हणून मणरी सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कादगे , सरपंच सिंधू गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब सांळुके, रणजित कादगे, गुरूदास सुर्वे, राजेंद्र कन्हेरे, बिभीषण कन्हेरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालक रूपाली कन्हेरे, आजी माजी सैनिक कल्याणकारी अध्यक्ष अक्रर शिंदे आदी नी भाषण केले. सुत्रसंचलन बनसोडे सर आभार भंडारे सर यांनी केले.
