Mpl चा थरार आज पासुन सुरु ; पहिल्याच सामन्यात सुरज शिंदे याला पाहण्यासाठी तालुका उत्सुक
करमाळा समाचार
एम पी एल चा थरार आजपासून सुरू झाला असून पहिला सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर हा रंगणार आहे. या सामन्याचा आनंद आपण डीडी स्पोर्ट वर घेऊ शकता. शिवाय फेसबुक वर एम पी एल पेजवर सदरचा सामना हा लाईव्ह सुरू आहे. या स्पर्धांचा आयोजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. याला बीसीसीआयने मान्यता दिल्याने यातील उत्कृष्ट खेळाडू पुन्हा एकदा आयपीएल सारख्या मंचावर आपल्याला गेलेले दिसतील. त्यामुळे आजच्या या सामन्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या सामन्यात करमाळ्यातील कोळगाव येथील सुरज शिंदे हा पुणेरी बापाकडून खेळताना दिसणार आहे.

Mpl live या लिंक वर क्लिक करुन मॅच पाहु शकता.

https://fb.watch/laQIlrmgSW/?mibextid=NnVzG8
महाराष्ट्र बाप्पा संघाकडून ऋतुराज गायकवाड तर कोल्हापूर संघाच्या प्रतिनिधित्व केदार जाधव हे करणार आहेत. आपल्या तालुक्यातील एक खेळाडू एम पी एल मध्ये खेळताना पाहण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास उद्घाटन समारोह सुरू झाला आहे. तर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.