आरोपीची आरोग्य तपासणी चालू असतांना तिच्या लहान बाळाची काळजी घेतल्याने महिला पोलिसाचे कौतुक
प्रतिनिधी –
छत्रपती शिवाजी महाराज हाँस्पिटल कळवा जि. ठाणे (ठाणे शहर) आरोपी ची आरोग्य तपासणी चालू असतांना तिच्या लहान बाळाची काळजी घेत असतांना महिला पो.काँ.सोनल दिलीप केंगार ठाणे शहर सोनल या माजी सहाय्यक फौजदार दिलीप केंगार यांची कन्या आहे.

तिने पोलिसात ही तिच्या माणुसकी व सामाजिक भान जोपासलं जातं याचे एक उत्तम उदाहरण सर्वांनां दाखवलं आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्या बद्दल ” होलार समाज समन्वय समितीचे राज्य सचिव तानाजीराव भडंगे साहेब यांनी माननिय दिलीप केंगार यांना फोन करून सोनल केंगार यांच्या कार्या बद्दल अभिनंदन केले आहे.
