करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तृतीय पारितोषिक

करमाळा


सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दला कडून गणेश उत्सव काळात उत्कृष्ट देखावा व शांततेत श्री गणेश मिरवणूक काढल्या बद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दुधाळ यांना देण्यात आले यावेळी मंडळाचे आधारस्तंभ सुनील बापू सावंत, बापू उबाळे, ओंकार सावंत, शिवराज गाढवे, जय बिडकर ,करण जाधव , आदी जण उपस्थित होते.

चालू वर्षी श्री गणेश उत्सव काळात सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आदर्श गणेश उत्सव संकल्पना, समाजामध्ये अभिमानास्पद काम, उत्कृष्ट देखावा, शांततेत मिरवणूक, तसेच सदर मंडळाचे सामाजिक कार्य , सार्वजनिक उपक्रम तसेच समाजामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा जपणे या साठी बक्षीस ठेवण्यात आले होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने सोलापूर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला असून याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे करमाळा शहरातील महिला व नागरिकांनी अभिनंदन केले व कौतुकही केले आहे

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE