उसणे घेतलेले पैसे माघारी मागितले म्हणून तिघांना मारहाण ; कोयत्याने मारल्याने महिला जखमी
करमाळा समाचार
उसने गेलेले पैसे माघारी कधी देतो’ असे विचारल्याचा राग मनात धरून पैसे मागणाऱ्यासह कुटुबीयांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात कोणाला दाखल झाला आहे. सदरचा प्रकार खातगाव क्रमांक तीन येथे घडला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर रणसिंग यांनी तक्रार दिली आहे.

शिवाजी झेंडे, अक्षय झेंडे, किरण झेंडे, शेखर झेंडे सर्व रा. खातगाव क्रमांक एक या सर्वांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रणसिंग यांनी झेंडे यांना दोन लाख रुपये हात उसने म्हणून चेक द्वारे दिले होते. त्यांनी ते मागील आठ दिवसापूर्वी कारखान्याचे बिल जमा झाले की परत देतो म्हणाले. परंतु दिले नसल्याने याबाबत विचारणा केल्या असता सुरुवातीला अक्षय झेंडे यांनी शिवीगाळ करत निघून गेला.
तर रात्री साडेदहाच्या सुमारास माघारी चौघेजण आले व त्यांनी रणसिंग यांच्यासह आई व पत्नीलाही मारहाण केली आहे. यामध्ये रणसिंग यांच्या आईच्या डाव्या हातावर मनगटावर कोयत्याने मारल्याने त्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.