करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दुख:द घटना – रिटेवाडी जवळ अपघात ; कमवता मुलगा गेल्याने कुटुंबावर दुखा:चा डोंगर

करमाळा समाचार

बचत गटाच्या कामा निमित्ताने कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेले शंकर प्रल्हाद येवले वय ३५ रा. गोयेगाव ता. करमाळा यांचा आज टिपर सोबत झालेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात दि २२ दुपारी एक च्या सुमारास कुंभेज ते पारेवाडी रस्त्यावर रिटेवाडी फाटा येथे झाला आहे. सदरच्या घटनेची माहीती मिळताच गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.

शंकर येवले यांच्यावर बचत गटाची समन्वय साधण्याची जबाबदारी होती. त्या निमित्ताने त्यांना सतत वेगवेगळ्या गावी जावे लागत होते. गुरुवारी ते कामाच्या निमित्ताने बाहेर पडले. यावेळी दुपारी रिटेवाडी फाटा येथे आल्यानंतर उतारावरून येणाऱ्या भरधाव वाहनासोबत समोरासमोर धडक झाल्यानंतर त्या वाहनाने त्यांना चिरडून निघून गेली. अपघात एवढा जोराचा होता की येवले यांचा जागीच मृत्यू झाला आहे अशी प्रथमदर्शनी माहीती मिळत आहे.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी येवले यांना उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचवले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व तपास सुरु केला आहे. तर गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. शंकर हा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबातील कमवता मुलगा अचानक गेल्याने येवले कुटुंबावर दुखा :चा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्च्यात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. अपघातानंतर गोयेगाव व पंचक्रोशीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE