करमाळा पोलिस निरिक्षक गुंजवटे यांची बदली ; त्यांच्या जागी घुगे यांची नियुक्ती
करमाळा समाचार
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने एका जिल्ह्यात चार वर्षात तीन वर्ष पूर्ण झालेले पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. यामध्ये करमाळ्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची पंढरपूर मंदिर सुरक्षा येथे बदली तर करमाळा तालुक्याला विनोद घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये करमाळा सह अक्कलकोट, कुर्डूवाडी, पंढरपूर, माळशिरस, बार्शी, माढा या भागातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे यांची बार्शी ग्रामीण पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या कारकीर्दीत करमाळा येथे मोठ्या प्रमाणावर चोरी, दरोडे यावर लगाम घातला होता तर संशयित आरोपींना पकडण्यात यश आले होते. तर सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यात गुंजवटे यांनी केलेल्या कामामुळे गुन्हेगारी कमी झाली होती.