छोट्या वाहनातुन वाळु वाहतुक ; पाच लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त
समाचार टीम
आपल्या मिनी पिकअप मधून वाळू वाहतूक करत असताना एकास करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये अंदाजे पाच हजार रुपयांची वाळू मिळून आली आहे. पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई 21 जुलै रोजी करण्यात आली.

संबंधित व्यक्तीवर भा.द.वि.कलम 379 व पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 , मोटार व्हेकील अँक्ट 3(1)/118 प्रमाणे सनी मनोहर धेंडे रा भाळवणी वय 19वर्ष 2) चंद्रभाण जगनाथ पालवे वय 27वर्ष रा. मलवडी ता करमाळा जि.सोलापूर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक 21/07/2022 रोजी 04/45 वा.चे सुमारास मौजे जेउर ता.करमाऴा गावचे हद्दीत मंगवडे नामे चालक सनी मनोहर धेंडे रा भाळवणी ता करमाळा मालक चंद्रभाण जगनाथ पालवे रा. मलवडी ता करमाळा याने नमुद वरील वर्णनाचे टाटा कंपणीचा इन्ट्र छोटा मिनी पिकअपमध्ये विनापरवाना पर्यावरणाचा -हास होईल हे माहित असताना देखील चोरून वाळूची वाहतूक करत असताना मिळुन आला आहे सदर वाहन जप्त केले आहे.