करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अर्बनच्या निवडणुकीत मातब्बरांच्या शर्यतीत ट्रकचालक पत्नी व सामान्य गृहिणी टॉपर

करमाळा समाचार 

दिवस रात्र कुटुंबासाठी काबाडकष्ट करणाऱ्या ट्रक चालकाच्या सामान्य कुटुंबातील राजकारण माहितीही नसलेली गृहिणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये टॉपर ठरली आहे. राजकीय डावपेच माहित नसणारी शिवाय विविध पदे भूषवलेले लोक सोबत असताना व स्वतः जास्त चर्चेतही नसताना सर्वाधिक मते मिळवण्याचा मान रंभापुरा येथील मीना अशोक करंडे यांनी मिळवला आहे.

नुकतीच करमाळा अर्बन बँकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये मागील बऱ्याच काळापासून नागरिक संघटना सत्तेत असल्याने इतर गट याकडे ढुंकूनही बघत नाहीत. याच संघटनेतील किंवा देवी यांचे निकटवर्तीय आपली नाराजी दाखवण्यासाठी विरोधी बाकावर जाऊन बसतात व आपली उमेदवारी जाहीर करतात. पण कायमस्वरूपी नागरिक संघटनेची या ठिकाणी सत्ता असल्याने सहाजिकच निकालही त्यांच्याच बाजूने लागणार हे तितकेच खरे आहे.

politics

करमाना अर्बन बँकेच्या निवडणुकीत सात हजार १२५ मते असले तरी यामधून बरेचसे मते मयत व दुबार असल्याचे दिसून आले आहे, ती मध्ये अद्याप पर्यंत कमी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हा आकडा फुगलेला दिसतो. पण तरीही सदर निवडणुकीत केवळ अठराशे एक मतदान झाल्याने बँकेच्या सभासदांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येत आहे. यामुळे पुन्हा एकदा या सभासदांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सदरच्या १८०१ मतापैकी विरोधी बाकावर बसलेल्या उमेदवारांना २०० मतांचा आकडाही पार करता आलेला नाही.

तर नागरिक संघटनेच्या सर्व विजयी उमेदवारांना चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान मतदान मिळाल्याचे दिसून आले. सदर निवडणुकीत चमकदार अशी कामगिरी करताना सामान्य गृहिणी असलेल्या मीना करंडे यांनी तब्बल १५८२ मते मिळवत विजय संपादित केला आहे. विशेष म्हणजे संघटनेतील इतर मातब्बर नेत्यांना त्यांच्यापेक्षा शंभर मतांचा फरक असल्याचे दिसून येत आहे. इतर उमेदवारांची वैयक्तिक गट किंवा मतदार असल्याचे दिसून येते तरीही त्याच्या मतात तफावत आहे. परंतु नागरिक संघटनेच्या प्रमुख नेत्यांच्या विश्वासास पात्र राहून मैदानात उतरलेल्या करंडे यांना सर्वच मतदारांनीही पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

मिळालेले मते …
सर्वसाधारण प्रतिनिधी-
विजयी – जितेश कटारिया १४३८, कलीम काझी १४३२, , ॲड. सुनिल घोलप १४९५, अनुज देवी १४७६, कन्हैयालाल देवी १४९३, यशराज दोशी १४९७, मोहिनीराज भणगे १४५०, अभिजीत वाशिंबेकर १५०८, प्रकाश सोळंकी, १४८०, ताराबाई क्षिरसागर १४५८ पराभुत – चंद्रशेखर घोडेगांवकर १६५, मालिक पिंजारी १८२, ब्रम्हदेव लोंढे १९९ तर

अनुसूचित जाती जमाती– वंदना कांबळे १५६४ (विजयी) सदाशिव वाघमारे १४२ (पराभुत)

इतर मागास प्रवर्ग – चंद्रकांत चुंबळकर १४५१ (विजयी), दिलीप गानबोटे १४५ (पराभुत), मालिक पिंजारी मलिक ९४(पराभुत)

महिला राखीवमीना करंडे १५८२ (विजयी), प्रमिला जाधव १५१२ (विजयी), नंदिनी घोलप १०१(पराभुत),

भटक्या विमुक्त जाती जमाती – गोरख जाधव – अविरोध.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE