करमाळा ग्रामीण भागातील वेब सिरीज चे दोन कलाकार झळकणार मोठ्या पडद्यावर
करमाळा समाचार
झरे येथील दिग्दर्शक अमोल काळे यांच्या याडपाट वेब सीरिज मधील दोन कलाकाराची मोठ्या चित्रपटासाठी निवड झाली आहे. सचिन भाऊ उर्फ हनुमंत निमगिरे व बबरू अण्णा उर्फ किरण कांबळे यांची नंदा म्युझिक कंपनी व न्यु चैतन्य म्युझिक प्रस्तुत भटकती आत्मा या चित्रपटासाठी निवड झालेली आहे.

अमोल काळे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की, खेडेगावातील मराठी वेब सिरीज चालू असताना आमचे दोन कलाकार मोठ्या फिल्मसाठी गेले ही माझ्यासाठी व माझ्या टीमसाठी खूप मोठी व कौतुकास्पद गोष्ट आहे. या दोन कलाकारांचा सत्कार याडपाट वेब सिरीज दिग्दर्शक अमोल काळे यांचे वडील माजी सरपंच खंडू बबन काळे यांनी व याडपाट टीमने सत्कार केला.
