करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शेतमजुऱ्याच्या मुलाची उतुंग भरारी ; अडचणींची शिडी तयार करुन मिळवले यश

करमाळा समाचार 

मोलमजुरी करण्यासाठी आई-वडिलांनी करमाळा सोडले व पुणे येथे स्थायिक झाले त्या ठिकाणी दुसऱ्याच्या शेतात काम करून मुलांचे शिक्षण घडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून धाकटा चिरंजीव वैभव भोगल इंजिनिअरिंगची परीक्षा पास झाला व एका मोठ्या कंपनीत कामालाही लागला. पण मुलाचं ध्येय वेगळंच होत. लागलेली नोकरी सोडून त्याने पुन्हा अभ्यासाकडे वळाला आणि शेतमजुर आई वडिलांचा मुलगा अगदी दुसऱ्या प्रयत्नात उत्तुंग भरारी घेत पीएसआय च्या परीक्षेत पास झाला आहे. विशेष म्हणजे घरापासुन वीस किमींचा पल्ला पार करुन वैभव अभ्यास करण्यासाठी जात होता यातुन त्याचाही संघर्ष दिसुन येतो.

करमाळा तालुक्यातील बोरगाव येथे अतिशय हालाखीच्या परिस्थितीत वास्तव्य करणारे भोगल दांपत्य यांनी उपजीविकेसाठी मागील २५ वर्षा पूर्वी करमाळा येथील राहते घर सोडून पुणे येथे मोलमजुरी करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी मुलांना शिक्षण देण्यासाठी कायम कष्ट व मोलमजुरी करीत उपजीविका चालवली. त्यातून मुलगा वैभव भोगल यांनी नाव कमवले. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत त्याने इंजीनियरिंग पास केली. २०१७ मध्ये त्याला नोकरीही लागली, पण नोकरीत त्याचे मन रमत नव्हते. त्यामुळे त्याने चार ते पाच लाख रुपयांचे पॅकेज असणारी नोकरी सोडली आणि पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा मधूनच काहीतरी करून दाखवायचे असे ठरवले.

politics

त्यानंतर वैभवने कोरोना नंतर २०२१-२२ मध्ये आपल्या घरीच अभ्यासाला सुरुवात केली. त्यातून त्याने विविध स्पर्धा परीक्षाही दिल्या. सध्या तलाठी व एसटीआय सारखे परीक्षा पास होऊन तो वेटिंग वर आहे. तर पहिल्या प्रयत्नात परीक्षा देत असताना दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास व स्पर्धा परीक्षेचा ताण यामुळे वैभवला पहिल्यांदा सदरची जागा मिळवता आली नाही. पण दुसऱ्या प्रयत्नात व मुख्य परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात वैभवने बाजी मारत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला व पीएसआयची जागा मिळवली आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत अभ्यास करीत कुटुंबाच्या पाठिंब्यावर वैभवने सदरची जागा मिळवली आहे. सगळ्या परिस्थितीमध्ये वैभवला त्याच्या मित्रांची मोठी साथ मिळाली. गरजेच्या वेळी मिळालेली आर्थिक मदत तो आजही विसरू शकत नाही.

मला नोकरी मिळाली पण माझे मन नोकरीत लागत नव्हते. धाडस करून मी नोकरी सोडली. पण त्यानंतर मजुरी करत असल्याचा असलेल्या आई-वडिलांचा कायम विचार डोक्यात असायचा. त्यांना त्यामधून मुक्त करण्याचा विचार मनात घेऊन मी अभ्यासाला सुरुवात केली. आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसतानाही माझ्या मित्रांनी मला आर्थिक सहकार्य केले. त्यातून मी ध्येय गाठण्याचे ठरवले. नोकरी सोडल्यानंतर मी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आई-वडिलांसह भाऊ व मित्रांनी ठेवलेल्या विश्वासामुळे आज मी हे यश मिळवू शकलो.
– वैभव भोगल, बोरगाव.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE