माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ; रक्तदान, आरोग्य व फिजिओथेरपी शिबिर
करमाळा समाचार
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व फिजिओथेरपी शिबिर गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा मौलाली माळ या ठिकाणी होणार आहे.

सदर कार्यक्रमाची उद्घाटन माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी यांच्या हस्ते, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. संग्राम माने , युवा एकलव्य प्रतिष्ठान व एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी जाधव, नगरसेवक संजय सावंत, डॉ. रोहन पाटील, डॉ. बाबुराव लावंड, डॉ. तुषार गायकवाड, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष वारे, सिकंदर जाधव, नगरसेवक प्रविण जाधव, बोरगाव सरपंच विनय ननवरे, ॲड. नवनाथ राखुंडे, सरपंच आशिष गायकवाड, पै. अफसर जाधव, ॲड. सुनिल घोलप , सुभाषराव जाधव, पत्रकार विशाल घोलप, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे आदि उपस्थित राहणार आहेत.