छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी स्थापन झालेल्या शिवकन्या सुरक्षा समिती अंतर्गत विविध कार्यक्रम
प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा येथे शिवकन्या सुरक्षा समितीच्या वतीने महिला व मुलींसाठी योगासने, झुंबा व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी दुपारी एक वाजता किल्ला विभाग येथे आयोजित केला असल्याची माहिती शिवकन्या सुरक्षा समितीच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गायकवाड यांनी दिली.

यावेळी गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सदर समितीची स्थापना ही मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी करण्यात आलेली होती सदर समिती अंतर्गत महिला व मुलींना योगासने, झुंबा, तलवारबाजी, कराटे, लाठी – काठी इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच वेळप्रसंगी मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे ? या बाबत संस्कार शिबिरे व विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी केलेल्या महिलांचे मार्गदर्शन शिबिरे समिती अंतर्गत घेतली जाणार आहेत. महिन्यातील प्रत्येक पंधरा दिवसांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
तरी सदर प्रशिक्षणाचा व शिबिराचा लाभ तालुक्यातील सर्व महिला व मुलींनी घ्यावा असे आवाहन यावेळी गायकवाड यांनी केले आहे.
