ऱाजवर्धन जिल्लाच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर वेलणकर संघाचा २१५ धावांनी विजय
करमाळा समाचार
करमाळा येथे सुरू असलेल्या पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत लेदर बॉल क्रिकेट सामन्यांमध्ये राजवर्धन जिल्ला याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर डी ए वाय वेलणकर महाविद्यालयाने डी बी एफ दयानंद महाविद्यालयावर २१५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुक्रवारी एकमेव सामना खेळवण्यात आला होता.

वेलणकर सोलापूर विरुद्ध दयानंद कॉलेज सोलापूर असा आज एकमेव सामना खेळण्यात आला. यामध्ये वेलणकर संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्धारित ४० षटकांमध्ये आठ बाद ३२१ धावांपर्यंत धावा गोळा करण्यात वेलनकर महाविद्यालयाला यश आले. त्यामध्ये राजवर्धन जिल्ला याने ८५ चेंडूत १६ चौकार व दोन षटकारांसह नावात १२५ धावांची खेळी केली.

अतिशय लहान दिसणारा हा खेळाडू पण चमकदार कामगिरी केल्याने प्रेक्षकांची त्यांनी मनी जिंकली. त्यासह रोहित मैले यांनी ७४ चेंडूत ११ चौकार व एका षटकारसह ८२ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना वेलणकर संघाच्या आदित्य जोशी यांनी चार विकेट मिळवल्याने सदरचा सामना एकतर्फी झाल्याची चित्र दिसून आले. या सामन्यांमध्ये वेलणकर संघाने दयानंद कॉलेजवर २१५ धावांनी विजय मिळवला आहे.