करमाळ्याच्या कर्तबगार युवकावर दिग्गज नेत्यांची कौतुकाची थाप
समाचार टीम
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या उलथापालतीचे साक्षीदार मंगेश चिवटे नुकतेच एका कार्यक्रमानिमित्त छत्रपती खा. संभाजी राजे व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत एका कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. शिवसेने सोबत बंडोखोरीनंतर सत्ता स्थापन करेपर्यंत व त्यापूर्वीपासूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले मंगेश चिवटे आज संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सांभाळत आहेत. त्यांचा आज एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या वतीने अगदी तोंड भरून कौतुक करण्यात आले. तर राजेंनी आवर्जून उल्लेख करीत चिवटे हे आपल्या व मुख्यमंत्री यांचीतील संभाषणाचा दुआ असल्याचेही सांगितले.

छत्रपती संभाजी राजे यांनी मंगेश यांचे कौतुक करत असताना म्हणाले की, माझ्याकडे एखादी युनिव्हर्सिटी जर असती तर मंगेश यांना त्या ठिकाणी डॉक्टरेट पदवी बहाल केली असती. एवढे काम त्यांचे आरोग्य विभागात सुरु असून त्याचा त्यांना अभ्यास झालेला आहे. या पद्धतीने स्वतः संभाजी राजे यांनी मंगेश यांचं कौतुक करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

त्याशिवाय मंत्री चंद्रकांत दादा पाटील हेही या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनीही मंगेश चिवटे यांचे तोंड भरून कौतुक केले. सर्व घडामोडींमध्ये त्यांची भूमिका किती महत्त्वाची होती हेही बोलण्याची पाटील विसरले नाहीत. तर चिवटे यांनी पार पाडलेल्या भूमिकेमुळे त्यांना कोणतेही पद किंवा अपेक्षित काहीही मिळू शकले असते. पण त्यांनी इतर काही न मागता केवळ त्यांना ज्याची आवड आहे तेवढेच मागितले ते म्हणजे आरोग्य विभागात काम करणे व ते आज महाराष्ट्रात आरोग्याची धुरा उत्तम प्रकारे हाताळत आहेत.
मुळात मंगेश चिवट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती. मुळातच ही संकल्पना त्यांनीच शिंदे यांच्याकडे मांडली व ती पूर्णत्वास नेली. त्यानंतर शिंदे यांचे ते विश्वासू असल्याने घडलेल्या प्रत्येक घडामोडीत साक्षीदार आहेत. यावेळी सत्ता आल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागात काम करणे पसंत केले व आज संपूर्ण वैद्यकीय कक्षाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहे.