Uncategorized

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची तहसील व करमाळा पोलीस स्टेशन येथे भेट

करमाळा समाचार 

करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून शालेय जीवनातच मुलांना कायदेविषयक बाबीची माहिती व्हावी,पोलीस स्टेशन व तहसील कार्यलयातील कामकाज कसे असते याची प्रत्यक्ष अनुभूती मिळणेसाठी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना करमाळा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयास भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचेशी थेट संवाद साधून तेथील कामकाजाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी विदयार्थ्यांना पत्रव्यवहार कक्ष,गोपनीय अभिलेख कक्ष, वायरलेस कक्ष संशयित आरोपींची कोठडी दाखवून सविस्तर माहिती दिली.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी पोलीस दलातील वापरात असलेल्या शस्त्रांची व विविध प्रकारच्या बंदुक, रायफल याबाबतची प्रत्यक्ष माहिती सांगितली, तसेच पोलीस सेवेमध्ये भरती होण्यासाठी कोणत्या स्पर्धा परीक्षा असतात यावर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने समर्पक उत्तरे दिली.

ads

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याची मुलांना ओळख झाली.. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले आरोपींना जेवण दिले जाते का?संशयित आरोपीना कशा प्रकारे वागणूक दिली जाते? गुन्ह्यातील तपास कसा केला जातो? याबाबत प्रश्न हिवरवाडी येथील विद्यार्थिनी प्रमिला पवार हिने पोलीस कर्मचारी यांना विचारले असता *पोलीस कर्मचारी यांनी उत्तर देताना सांगितले की, सर्व आरोपीना जेवायला दिले जाते आणि त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाते आरोपीमध्ये सकारात्मक सुधारणा व्हावी ही कायद्याची अपेक्षा असते.

आज प्रत्यक्ष पोलीस स्टेशन येथे भेट दिल्यामुळे पोलिसांबद्दल असलेली भीती कमी झाली अशा प्रातिक्रिया मुलांनी यावेळी व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी पोलिस कस्टडी मध्ये असलेल्या संशयित आरोपींशी देखील संवाद साधला असता एका आरोपीने विद्यार्थ्यांशी बोलत असताना अत्यंत भावनिक होत “रागाच्या भरात भांडण केले आणि आज मुलांपासून, पत्नीपासून, आई-वडिलांपासून दूर होऊन या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये आहे” त्यामुळे वाद,भांडण न करता तोडगा काढून हे प्रश्न मिटविले पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले.

यानंतर मुलांनी तहसील कार्यालय येथे भेट दिली तहसीलदार समीर माने यांच्या कक्षात भेट देऊन तेथील कामकाजाची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली यावेळी श्री.गोसावी यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांची विद्यार्थ्यांनी माहिती दिली. मुलांना त्यांच्या शालेय जीवनात प्रथमच प्रत्यक्ष तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनमध्ये भेट देण्याची संधी मिळाल्याने उपस्थित शिक्षक यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले.

Karmala police, karmala tahasil, panchayat samiti karmala, bdo manoj raut

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE