करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोठे दगड पुरण्यासाठी घेतलेल्या खड्ड्यात पाच फुटावर लागले पाणी

करमाळा समाचार

तालुक्यात सध्या पन्नास पेक्षा जास्त टॅंकर सुरू असून गावोगावातील विहिरींसह बोअर अटलेले दिसून येत आहेत. एवढेच काय तर शहरातील बोअर सुद्धा आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्याच कामासाठी खोदत असलेल्या खड्ड्यामधून पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ पाच फुटाच्या खड्ड्यात पाणी लागल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.

सदरची आश्चर्यकारक घटना तालुक्यातील वीट येथील उदय ढेरे या शेतकऱ्यांच्या शेतात घडली आहे. गावापासून दोन ते तीन किलोमीटरवर मोरवड रस्त्याला उदय ढेरे यांची शेती आहे. ढेरे यांच्या शेतीसह परिसरातील विहिरींचे पाणी आटल्याने शेतीत सध्या कोणतेच पीक नव्हते. त्यामुळे शेतीची मान्सूनपूर्व डागडुजी करून घ्यावी या उद्देशाने ढेरे यांनी शेतातील मोठे दगड गोटे काढण्याचे ठरवले व सदरचे मोठे दगड कुठे नेऊन टाकायचे हा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी शेतात शेजारीच एक मोठा खड्डा खाणून त्यामध्ये सदरचे गोटे फोडून टाकू या उद्देशाने एक खड्डा ते खांदत होते.

politics

यावेळी पाच फुटाचा खड्डा खांदत असताना एका ठिकाणाहून पाण्याचा झरा सुरू झाला. जवळपास एक महिनाभरापासून परिसरातील विहिरींचे पाणी पूर्ण आटले होते. तर ढेरे यांच्या शेतातील विहिरीतून कसेबसे थोडेफार पाणी मिळून येत होते. पण जो खड्डा घेतला त्या खड्ड्यातील पाणी सतत वाहत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात पाणी टिकेल असे त्यांना सुरुवातीला वाटले परंतु तीन ते चार तास पाणी उपसा केला जाईल इतके पाणी मिळून येऊ लागले. त्यामुळे ढेरे यांनी सदरचा खड्ड्याची खोली तसेच रुंदी वाढवली व एक मोठी विहीर सध्या त्या ठिकाणी झाली आहे.

आता तीन ते चार परस विहिर घेतल्यानंतर खालीही पाण्याचे झरे मिळुन आले आहेत. मुळातच कसलीही अपेक्षा नसताना त्या ठिकाणी पाणी लागल्याने त्याशिवाय एवढ्या दुष्काळात सगळीकडचे पाणी अटत असताना तिथे पाणी लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

श्रीनिवास वडकबाळकर, निवृत्त प्राचार्य दयानंद महाविद्यालय, सोलापूर म्हणाले …
संबंधित ठिकाणी पाणी लागणे यामागे नक्कीच कोणती न कोणते सोर्स उपलब्ध असतात. ज्या ठिकाणी पाणी लागले आहे त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर अधिक विस्तृत माहिती मिळू शकते. पण पाणी उपसा योजना किंवा तलाव याशिवाय पावसाचे आडून मुरलेले पाणी अशा वेगवेगळ्या माध्यमातून सदरचे पाणी जमिनीतील मुरमाड दगडाच्या माध्यमातून पुढे सरकत राहते किंवा साचून राहिलेले असते. याला पॉकेटेड वॉटर असे म्हणले जाऊ शकते अशा ठिकाणी त्याला वाट मिळाल्यानंतर ते पाणी मिळून येऊ शकते. पण संबंधित ठिकाणी गेल्यानंतर अधिक ठामपणे आपण तर्क काढू शकतो. सदरच्या पाण्याचा सोर्स पाहून आपण ठरवू शकतो की हे कायम राहील की तात्पुरत्या स्वरूपाचे आहे त्यासाठी पाहणी करावी लागेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE