आता याला काय म्हणावे – लाईट गेल्यावर केला पोलिसांना फोन आणी …
प्रतिनिधी – करमाळा
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मागील दोन दिवसापूर्वी पाऊस झाल्यानंतर सतत लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये दोन ते तीन वेळा तारा तुटल्याचेही आढळून आले आहे. तर बऱ्याच वेळा लोड वाढल्याने डीपीवरील फ्युज जाणे, जाळ होणे असे प्रकार घडताना दिसतात. पण यासाठी महावितरणला संपर्क करण्याऐवजी एका बहाद्दराने थेट पोलीस ठाण्यात कॉल केला.

पोलीस ठाण्याच्या वतीने दिला गेलेला 112 हा टोल फ्री क्रमांक पोलीस मदतीसाठी दिला गेलेला आहे. कधीही कुठेही कसलीही पोलिसांची मदत पाहिजे असेल तर त्या क्रमांकावर संपर्क केल्यास पोलीस मदत तात्काळ मिळते. यासाठी हा नंबर कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
यावर बऱ्याच वेळा विविध कामात त्यासंदर्भात संपर्क करून लोक मदतही मागतात व त्यांचे कामही होतात. चोरी, दरोडा, खून, लूटमार, संशय, भीती अशावेळी संपर्क केला तर पोलीस तात्काळ सहकार्य करू शकतात व मदतही देऊ शकतात. हा यामागचा उद्देश आहे. पण काल घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांनाही हसावे का रडावे हा प्रश्न पडला असेल.

शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास करमाळा शहरात लाईट गेली होती. तर लाइट लवकर न आल्याने एका नागरिकाने थेट 112 या क्रमांकावर फोन केला आणि मागील अर्ध्या तासापासून लाईट नाही अशी तक्रार 112 या क्रमांकावर नोंदवली. वास्तविक पाहता विजेची बाब ही महावितरणच्या कार्यक्षेत्रात येत असते आणि तक्रार पोलिसांकडे केली जाते व त्या वेळी अशा लोकांनी केलेली तक्रार ही चर्चेचा विषय ठरते. त्यामुळे पाहणार्यांना हसू थांबवता येणार नाही.