E-Paperकरमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

बसस्थानक ते नवी प्रशासकीय इमारत परिसर जागेचा १४० कोटींचा व्यवहार ?

करमाळा समाचार 

शहरातील बस स्थानक व परिसरातील जमीनीचा वाद बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबीत आहेतयामध्ये शासन व कुरेशी समाज यांच्याच न्यायालयात लढाई सुरु आहे. यात एका व्यापाऱ्याच्या माध्यमातुन आमदारांनी मध्यस्थी करीत १४० कोटींना जमीनीचा व्यवहार केला असुन सगळी जमीन लाटण्याचे ठरवले त्यामुळे प्रशासकीय इमारत तिकडे नेण्याचा डाव आखला असा आरोप करीत मा. आ. जयवंतराव जगताप यांनी शिंदेहे राजकारणासाठी नव्हे तर व्यवसायासाठी आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सगळेच प्रश्न सोडवतो या मागे दुसरा अर्थ असल्याचेही जगताप म्हणाले.

दिवंगत नेते माजी आमदार स्व. नामदेवरावजी जगताप यांनी तालुक्यातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी परिसरात बस स्थानक उभारले होते. या परिसरातील जमीन ही संबंधित लोकांच्या माध्यमातून जगताप यांनी मिळवली व त्या ठिकाणी बस स्थानक उभे केले. कालांतराने पुढच्या पिढीने त्या जमिनीवर दावा केला व तो वाद न्यायालयात जाऊन पोहोचला. आजपर्यंत स्थानिक नेत्यांकडून त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप होताना दिसून येत नव्हता. पण त्यात शिंदे यांनी लक्ष घातल्याचे जगताप यांनी सांगितले आहे.

politics

http://*माढा कुर्डुवाडीत राबवलेली भ्रष्टाचाराची पद्धत करमाळ्यात – जगतापांचा आरोप* https://karmalasamachar.com/corruption-pattern-practiced-in-madha-kurdwadi-in-karmala-jagtaps-allege/

त्यातूनच त्यांनी सदरची सदरच्या जमिनीचा व्यवहार हा कुर्डूवाडी येथील प्रसिद्ध व्यापारी मध्यस्थी घालून केला आहे. त्यासाठी १४० कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून त्यामध्ये बस स्थानक, बचत गट इमारत, नवीन प्रशासकीय इमारत परिसर , पंचायत समिती सभापती, भवन रेणुका नगर यासारखा परिसर येतो. यामध्ये पाच कोटी रक्कम देण्यात आल्याची माहितीही यावेळी जगताप यांनी दिली. विशेष म्हणजे यात ५५ ते ५६ वारस आहेत. या ठिकाणी बस स्थानक हटवून किंवा त्याला भाडे सुरू करून त्या परिसरात गाळे व रहिवासी बिल्डिंग उभा करून व्यवसाय करण्याचा हेतू असल्याचा आरोपही यावेळी जगताप यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी अचानक प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. स्थानिकांचा विरोध असतानाही सदरची इमारत ही मौलाली माळ या ठिकाणी नेण्यात आली. शहरातील सर्वपक्षीय युवक व स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जुन्या तहसील परिसरात जागा उपलब्ध असताना तहसील कार्यालय करमाळा शहरापासून दोन किमी अंतरावर नेऊ नये अशी मागणी होती. यासाठी आंदोलने ही झाली पण तरीही त्यात आजपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला दिसून आला नाही. त्यामुळे जगताप यांनी केलेल्या आरोपांवर एक प्रकारे तथ्य असल्याचे चर्चांना उधाण आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE