करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

भारतीय जनता पार्टी करमाळा बाजार समितीचे निवडणूक लढवणार

करमाळा समाचार

नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा बाजार समिती निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव तथा भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य दीपक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात लवकरच सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावणार असल्याचे दीपक चव्हाण यांनी सांगितले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देशात आणि राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना तसेच शेतकऱ्यांचा विकासासाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहेत सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या शेतकरी किसान सन्मान योजना , राज्य सरकार द्वारे नमो किसान सन्मान योजना ,एक रुपयात पिक विमा, महाडीबीटी कृषी यांत्रिकी करण योजना , मागेल त्याला शेततळे अशा वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्याचे काम सरकारकडून होत आहे .

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणे व शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा करणारी संस्था आहे .या संस्थेत भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी पाठवून करमाळा बाजार समितीचा तसेच करमाळा चा विकास करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी करमाळा या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे .

माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, मा. पालकमंत्री विजयकुमार देशमुख ,जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी ,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,लोकसभा निवडणूक प्रमुख राजकुमार नाना पाटील, ज़िल्हा अध्यक्ष चेतनसिह केदार , संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटिल ,शशिकांत चव्हाण विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE