करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी 175 पोती सुपारी चोरांना घेतले ताब्यात ; टॅंम्पो चालकाला मारुन पळवली होती सुपारी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातून जातेगाव परिसरात एका टेम्पो चालकाला थांबून मारहाण करून त्याच्याकडील 175 गोणी लुटून नेल्याचा प्रकार घडला होता. सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान तपास करण्यात आला. त्यामध्ये 12 लाख 98हजार 500 रुपयाची चोरुन नेलेली सुपारी मिळून आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक तानाजी पवार यांनी केला.

सदरचा गुन्हा दिनांक 3 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला होता. टेम्पोला स्कॉर्पिओ कार आडवी लावून टेम्पो चालकाला मारहाण करून 175 कोण्या चोरून घेऊन गेले होते. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवान तपास करत तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणात सौरभ पवार जिल्हा बीड, अनिल पवार जिल्हा बीड, फरिद शेख रा. परांडा आदि ताब्यात घेतले आहेत.

सदरच्या कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार, पोलीस हवलदार संतोष देवकर, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल मनिष पवार, सिद्धेश्वर लोंढे, हनुमंत गवळी, अभिजीत जगदाळे, सोमनाथ जगताप, लोहार, व्यंकटेश मोरे, डाकवाले व महिला पोलिस कॉन्स्टेबल अनारसे आदीच्या पथकाने कामगिरी केली आहे.