करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तडेपारीचा आदेश धुडकावून पोलिसांना शिवीगाळ पुन्हा तालुका हद्दीत ; पोलिसाकडुन कारवाई

करमाळा समाचार

उपविभागीय दंडाधिकारी माढा कुर्डूवाडी विभाग जयश्री आव्हाड यांनी दोघांना तडीपार केल्याचा आदेश दिला होता. त्या अनुषंगाने पोलीस माहिती देण्यासाठी गेल्यानंतरही त्यांना शिवीगाळ करणाऱ्या त्यातील एकास पुन्हा एकदा करमाळा तालुका हद्दीत मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्याच्यावर कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तो सतत गावात येऊन परिसरात त्रास देत असल्याच्या घटनाही घडत होत्या. याबाबतची तक्रार पोलीस नाईक पोना अशपाक रज्जाक शेख यांनी दिली आहे.

1) आनंद तानाजी धायगुडे 2) तानाजी बापु धायगुडे दोघे रा. खातगाव नंबर 1 ता. करमाळा यास मा. जयश्री आव्हाड उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुडूवाडी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 प्रमाणे दि. 18/12/2025 अन्वये तडीपार केले होते. जेव्हा पोलिस तडीपार केले बाबतची नोटीस बजावणी करणे करीता दि. 25/11/2025 रोजी खातगाव येथील पोलीस पाटील यांचे समक्ष जावुन नोटीस बजावणी करणे करीता गेले. तेव्हा संबंधित दोघाना नोटीस बाबत सर्व माहीती देवुन दोघाना सदरची नोटीस दिली. त्यांनी नोटीस वाचुन दुय्यम प्रतीवर सही न करता नोटीस घेतली नाही व मला कोणी तडीपार केले असे म्हणुन पोलिसांना व पोलीस पाटील यांना शिवीगाळ केली.

तर दिनांक 11/12/2025 रोजी बातमीदार यांचे मार्फत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना बातमी मिळाली की, सोलापुर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यातुन तडीपार केलेला इसम नामे आनंद तानाजी धायगुडे रा. खातगाव ता. करमाळा जि. सोलापुर हा मौजे खातगाव येथील राहते घरी असल्याबाबत व आजु बाजुस दहशत निर्माण करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व वरिष्ठ पोलीस निरिक्षक रणजित माने सो यांचे आदेशान्वये सदर इसमास पकडणे करिता पोलीस रवाना झाले.

यावेळी तो घरासमोर सायंकाळी ७ वा. सुमारास बसलेला दिसला. धायगुडेवर तडीपारीचा आदेश होवुन देखील बरेच दिवस झाले गावामध्ये येत आहे व आजही तो आला होता. तरी मा. उपविभागीय दंडाधिकारी सो. माढा विभाग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 56 अन्वये काढलेल्या हद्द‌पार आदेशाचा भंग करुन सोलापुर जिल्ह्यात येण्याची कोणतीही परवानगी नसताना तो वरील ठिकाणी सोलापुर जिल्ह्यात दिसुन आला व त्याने त्यास दिलेल्या ह‌द्द‌पार आदेशाचा भंग केला आहे. म्हणुन माझी त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE