18 ते 44 लसीकरण प्रतिक्षा संपली ; नियोजन पुर्ण गर्दी न करण्याचे आवाहन
करमाळा समाचार
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवार दिनांक 23 जून रोजी 18 ते 44 वयोगटातील लाभार्थी लसीकरण सुरू होत आहे. यासाठी लसीकरण केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. हे त्यापूर्वी www.cowin.gov.in या संकेतस्थळाला किंवा आरोग्य सेतु या पोर्टलचा वापर करून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

ग्रामीण शासकीय रुग्णालयांमध्ये उपजिल्हा रुग्णालय तीन ग्रामीण रुग्णालय चौदा प्राथमिक आरोग्य केंद्रे 77 असे एकूण 94 ठिकाणी लसीकरण केले जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. सदरच्या वेळी ऑनलाइन नोंदणी केलेल्या लाभार्थीने दिलेल्या वेळेत पोहोचायचे आहे. लसीकरणाच्या ठिकाणी ऑनलाइन बुकिंग केले जाणार नाही किंवा लसीकरण केले जाणार नाही.

ज्यांनी ऑनलाईन बुक केले आहे त्यांनी नऊ ते दुपारी तीन या वेळेत लसीकरण याचा लाभ घ्यावा. शहरातील लोकांनी शहरात व ग्रामीण लोकांनी ग्रामीण भागातच नाव नोंदणी करावी असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.