करमाळासोलापूर जिल्हा

भारत हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

सुहास ढेंबरे – जेऊर

आज रोजी जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येच्या जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती उत्साहात संपन्न झाली.

“” ज्ञान नाही विद्या नाही , ते घेणेची गोडी नाही ,, बुद्धी असुनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का ?”” असा महत्त्वपूर्ण प्रश्र्न आपल्या काव्यातून निर्माण करुन अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या दिनांना दैदिप्यमान मार्ग दाखविणा-या खरी खुरी विद्येची दैवत असणा-या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दि. ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे पाटलांच्या कुळात झाला.

अवघ्या ९ व्या वर्षीच त्यांचा विवाह युगप्रवर्तक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि १८४०
पासून त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला व ज्योतिबाच्या ज्योतीवर ज्ञानाची ज्योत पेटली.आपल्या संसाराचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी चंदनासम साध्वी झिजली. या देशात सर्व अनर्थ एका अविद्येने केला आहे हे कटू सत्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओळखून १८४८ मध्ये पुणे येथे भिडेचा वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली व सावित्रीबाई फुले १ जानेवारी १८४८ रोजी तिथल्या पहिल्या शिक्षिका झाल्या. देशातून पहिली स्त्री शिक्षिका बनण्याचा मान पटकावला.
‘” अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांतीज्योत !!””
“” अनंत अडचणींवर मात करून स्त्रीशिक्षणाचा पाया
रचणा-या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.””

सदर कार्यक्रमाची सुरुवात भारत हायस्कूलच्या महिला सहशिक्षिका सौ.सुरेखा लकडे व सौ.सुरेखा पोळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून केली.

सदर कार्यक्रमासाठी प्रशालेतील सहशिक्षक सरक बी.सी., निलेश पाटील, अंगद पठाडे, पांडुरंग चव्हाण, बाळासाहेब कदम, सुनील तोरमल, हनुमंत रूपनवर, जनार्धन पाटकुलकर, माधव कांडेकर, दत्ता वाघमोडे, जयंत शिरस्कर, सुहास ढेंबरे, मुलाणी साहेब, साळवे साहेब आदी सर्व उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे ज्येष्ठ सेवक महादेव साळुंके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE