करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा विधानसभा मतदारसंघात अघोषित उमेदवारीमुळे मतदारात संभ्रम

केत्तूर (अभय माने)

244 करमाळा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय शिंदे हे पुन्हा एकदा अपक्ष म्हणूनच मतदारासमोर जाणार आहेत तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लढत देणार आहेत.दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ हेही आपले नशीब आजमावणार आहेत.

महायुतीकडून न लढता विद्यमान आमदार संजय शिंदे अपक्ष लढणार असल्याने महायुतीकडून उमेदवारीसाठी शिवसेना (शिंदे गट) व भाजपमध्ये जुंपली आहे. शिवसेना (शिंदे गटाकडून) जिल्हाप्रमुख महेश चिवटे तसेच वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,गणेश कराड हे तर भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे तसेच रश्मी बागल, दिग्विजय बागल यांनी फिल्डिंग लावली आहे.

politics

त्यामुळे मतदारांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे आता महायुतीकडून कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळणार व उमेदवार कोण असणार ही अखेरच्या टप्प्यात स्पष्ट होईल असेच सध्यातरी दिसत आहेत.

मतदारसंघात शुक्रवार (ता.25) पर्यंत 16 उमेदवारांनी आपले अर्ज नेले आहेत त्यामुळे निवडणूक उमेदवारांच्या संख्येवरून बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातही सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तालुक्याचा आमदार कोण होणार ? निवडून कोण येणार ? पक्षाचे तिकीट कोणाला मिळणार ? कोण कोणाला पाठिंबा देणार ? याबरोबरच शेतकऱ्यांसाठी चांगले सरकार कोणते येईल ? आरक्षण मिळेल काय ? तरुण वर्गाचा नोकरीचा प्रश्न मिटेल काय ? पुन्हा एकदा पक्षामध्ये फटाफूट होईल का ? याबाबत चर्चा रंगू लागले आहेत.

दिवसभर शेतात काम करणारा शेतकरीवर्ग सध्या सकाळी व संध्याकाळी निवडणुकीचीच चर्चा करण्यात दंग होत आहे तर तरुण वर्ग मात्र सोशल मीडियात रील्स,व्हिडिओ,मेसेज करण्यात गुंग झाला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE