करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यात मुस्लिम धर्मीयांकडुन स्त्युत्य पाऊल ; हिंदुधर्मीयाकडुन निर्णयाचे स्वागत

करमाळा प्रतिनिधी – अमोल जांभळे 

हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा असा आषाढी एकादशी व मुस्लिम समाजातील महत्त्वाचा बकरी ईद हा सण दोन्हीही एकाच दिवशी आल्याने करमाळा तालुक्यातील जवळपास ९० टक्के मुस्लिम समाजाने बकरी ईद एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

करमाळ्यात कायमच सामाजीक सलोखा कायम राहिल असे वातावरण असते. हिंदु धर्मीयांची संख्या मोठ्याप्रमाणावर असताना. ज्या गावात मुस्लिम समाज नाही अशा गावातही मुस्लिम सण साजरे केले जातात. त्याठिकाणी दर्गा आहेत अशा दर्गात हिंदु धर्मीयांचीही रेलचेल असते. शिवाय हिंदुंचे श्रद्धास्थान कमलाभवानी मातेच्या दर्शनाला मुस्लिम धर्मीयही हजेरी लावताना दिसले आहेत. तर मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या दर्गा असतील किंवा आवाटी येथील श्रध्दास्थान असेल तिथे हिंदु धर्मीय मोठ्याप्रमाणात जातात.

शहर व तालुक्यात महापुरुषांच्या जयंत्या असतील किंवा उरुस व सवारी सारखे कार्यक्रम असो दोन्ही समाज एकत्रीत कार्य करताना दिसतात. करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व गणपती सारख्या मिरवणुका मशीदी समोरुन जाताना फुलांचा वर्षाव केला जातो तर नवरात्रात हिंदु सण असल्याने नऊ दिवस उपवास असतात तर मुस्लिम समाजही मासांहार टाळतो. रमजान महिण्यात हिंदुंच्या वतीने इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशा खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही समाज एकत्र राहतात.

त्याचाच प्रत्यय यंदाही आला आहे. दोन वर्षानंतर हिंदुचा सर्वात मोठा सण धुमधडाक्यात साजारा होत आहे. पण तिथी प्रमाणे मुस्लिम समाजाचा बकरी ईद व हिंदुचा आषाढी एकादशी एकाच दिवशी आली आहे. या दिवशी हिंदु उपवास करतात तर वारी करीत विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. लाखो भावीक मोठ्या उत्साहात दर्शन घेतात. अशा वेळी बकरी इद साजरी करण्याचे मुस्लिम समाजाने टाळले व ते दुसऱ्या दिवशी साजरी करणार असे जाहीर केल्याने क्वचित सोडले तर सर्वच समाजाने सण साजरे कऱणे टाळले आहे. याचे हिंदु धर्मीयांनी स्वागत केले आहे.

हिंदु मुस्लिम भाई भाई आहेत राजकारणी लोक सोडले तर दोन्ही समाजातील लोकांमध्ये कसलाही द्वेश नाही. आमच्या भागात कायमच सगळे खेळीमेळीच्या वातावरणात राहतात. यात्रे दरम्यान आम्ही काही नियम पाळतो तर हिंदुंचेही आमच्या सणांत कायम सहकार्य असते. यावेळी आमच्या सर्व समाजाने बकरी ईद एकादशी दिवशी न करता दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
– बिल्डर बागवान, करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE