करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

अर्बन बॅंकेच्या मतदान प्रक्रियेत २५.२७ टक्के मतदान ; बुथनिहाय आकडेवारी

करमाळा समाचार 

माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मतदान केले

करमाळा अर्बन बँकेच्या १४ जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये ७ हजार १२५ मतदारांपैकी १८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल १५ वर्ष नंतर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आल्याने मतदारांमध्येही पाहिजे तितका उत्साह बघायला मिळाला नाही. त्यामुळे सदरची टक्केवारी केवळ २५.२७ पर्यंत जाऊन थांबली. सदरची मतदान प्रक्रिया ही १६ बूथ च्या माध्यमातून करण्यात आली. उद्या सकाळी नऊ वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी नागरिक संघटनेचे कायम वर्चस्व राहिलेल्या आहे. या ठिकाणी मागील अनेक वेळा अविरोध निवडणुकीचा पायांडा पडलेला होता. यंदाही सदरची निवडणूक एक प्रकारे अविरोधच्या दिशेने जात असताना सात उमेदवारांनी माघार न घेतल्याने सदरची निवडणूक लादली गेली. मागील काही काळापासून निर्बंध असलेल्या या बँकेवर निवडणुकीचा अधिकचा खर्च मात्र वाढलेला दिसून येईल.

सदरची निवडणूक प्रक्रिया सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू होती. करमाळा शहरात महात्मा गांधी शाळेत सहा बूथ व आंबेडकर शाळेत सात बूथ च्या माध्यमातून प्रक्रिया पार पडली. तर जेऊर, कंदर व केतुर या ठिकाणी प्रत्येकी एका बुथवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी शहरातील मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावला आहे.

politics

बुथनिहाय मतदान …
महात्मा गांधी शाळा येथे बुथ क्रमांक एक – १३७, दोन- १४९, तीन -१४१, चार -१९७, पाच – १२६, सहा -१९४,

डॉ. आंबेडकर बुथ क्रमांक सात -९०, आठ – ११०, नऊ – १००, दहा – ६३, आकरा – १०३, बारा – ९९, तेरा – ९२,

जेऊर बुथ क्रमांक चौदा – ११०,

कंदर बुथ क्रमांक पंधरा – ३८,

केत्तुर बुथ क्रमांक सोळा – ५२ असे मतदान पार पडले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE