करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद ; मंडलनिहाय आकडेवारीसह पावसाची फोटोसह माहीती

करमाळा समाचार 

करमाळ्यात घर पाण्यात

तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी मागील बॅकलॉग भरुन काढण्याचे काम पावसाने केले आहे. संपुर्ण पावसाळ्यात दुर्लक्षित तालुक्यात सर्वदुर पाऊस झाला त्यामुळे शेतीसह घरात पाणी घुसल्याने पीकासह घराचेही नुकसान झाले आहे. नुकसान झाल्याने शेतकरी दुखी असला तरी पावसाने पिण्याच्या पाण्याची व पुढील शेतीसाठीच्या कामाची कसर भरुन निघणार आहे. आज पर्यतच्या इतिहासात एकाच दिवसात तब्बल 871 मीमी पावसाची नोंद येवढ्या मोठ्याप्रमाणावर झालेली नाही. तालुक्याची एकुण सरासरी 109 मीमी आहे.

सीनानदी शंभर टक्के भरली असुन सीना कोळगाव धरणाची दारे उघडली आहेत. तर सकाळ पासुन रिमझिम पावसाने सुरुवात झाली होती. अनेक भागात पाण्याची चणचण होती तिथे पिकांचे तर दुर पिण्याच्या पाण्याचीही अडचण निर्माण झाली होती. पण आज झालेल्या परतीच्या पावसाने दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील जेऊर, सातोली, जिंती, पाडळी, मांगी अशा सर्वदुर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झालेल्या पावसाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपली हजेरी नोंदवली.

शहरात पाणी साठण्याचे प्रमाण जास्त नसले तरी बऱ्याच घरात पाणी गेल्याचे दिसुन आले. ग्रामीण भागत जेऊर येथे रेल्वेचा उड्डान पुल आहे तो निम्म्याहून अधिक पाण्यात गेला होता. जिंती परिसरात पावसाचे पाणी शेतात साठल्याने शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते उस व कांदा ही पिके मुख्यतः घेतली जातात. कांदा पुर्ण वाया गेलातर उसला काढण्यासाठी अडचणी येणार आहेत. पाडळीतही कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

करमाळ्यातील देवीचामाळ रस्त्यावरील बाभळीचे झाड उन्मळुन रस्त्यावर पडल्याने रस्ता पुर्ण बंद झाला होता. तर बराच वेळ पाऊस असल्याने रस्ता ओस असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. तसेच गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने वेळेत जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजुला काढण्यात आले.

कोर्टी
करमाळा देवीचामाळ रस्ता
राजुरी
केत्तुर
गुलमोहर वाडी

p

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE