महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचा 35 वा वर्धापन दिन
समाचार टीम –
कळविण्यात आनंद होतो की, पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा 35 वा वर्धापन दिन असून गेली 35 वर्षे पोलीस मित्र संघटना पोलीस व पोलीस कुटुंबीय तसेच नागरिकांसाठी कार्यरत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. संघटनेच्या 35 व्या वर्धापन दिना निमित्त पोलीस दलातील, सामाजिक क्षेत्रातील तसेच पत्रकारितेमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास मंत्री महोदय, राजकीय, सामाजिक व पोलीस दलातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरचा कार्यक्रम शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, शिवाजीनगर, पुणे 5, येथे होणार आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन आयोजन केले आहे.
तरी सदरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र कपोते संस्थापक अध्यक्ष, पोलीस मित्र संघटना यांनी केले आहे.