E-Paperक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

तपासावर प्रश्नचिन्ह- केत्तुर खुन प्रकरणाला उलटले चाळीस दिवस ; पोलिसांना दोन जणांवर संशय

समाचार टीम

शुक्रवारी दि १ जुलै २२ रोजी दुपारी केत्तुर ता. करमाळा येथील जनावरांच्या मागे गेलेल्या शिवाजी सिताराम येडे (वय ४८) रा. केत्तुर ता. करमाळा यांचा खून झाला होता. त्याला आज तब्बल ४० दिवस उलटले तरीही खुनी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. सदरचा खून नेमका कशातून झाला हे जरी स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागल्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले आहे. पण तरीही प्रकरणातील खुनी अजूनही हाती लागत नसल्याने खुनी मोकाट फिरत आहे. यातुन तपास योग्य दिशेने सुरु आहे की हवेत अंदाज व्यक्त केले जात आहेत हा प्रश्न आहे.

शिवाजी येडे हे शुक्रवारी दुपारी म्हशी घेऊन शेताकडे गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते म्हशी घेऊन माघारी फिरत असत. पण शुक्रवारी शिवाजी येडे हे माघारी आलेच नाहीत. परंतु म्हशी मात्र घरी पोहोच झाल्या होत्या. थोड्या उशिरा येतील म्हणून घरच्यांनाही लगेचच शोधाशोध केली नाही. पण रात्र झाली तरीही येडे घरी आलेच नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केली. तर याबाबत पोलिसात ही तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी येडे यांचा मृतदेह गावातील स्मशानभूमी शेजारी दि २ रोजी सकाळी ६ वाजता मिळुन आला होता. येडे यांच्या डोक्यात कोणीतरी जोरदार घाव केल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी हा तपास स्वतः हाती घेतला होता. ४० दिवसात त्यांनी विविध गावांमध्ये खुन्याला शोधण्यासाठी जोरदार मोहीम राबवली. तपास केला अनेकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. पण आज तब्बल महिना उलटूनही खुनी पोलिसांच्या हाती लागला नाही. नेमका तपास योग्य दिशेने चालू आहे का ? हा आता प्रश्न पडू लागला आहे. या संदर्भात एक पथक आरोपीला पकडण्यासाठी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली. पण ते पथक करमाळ्यातच घिरट्या घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमका तपास सुरू आहे का स्वतः खुनीच पुन्हा करमाळ्याला हजर होणार आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनैतीक संबधाच्या संशयातुन खुन !
खून झाल्यापासून पोलिसांनी वेगवान तपास केला खरा पण आतापर्यंत केवळ अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे मुळात जोपर्यंत खुनी मिळून येत नाही तोपर्यंत नेमके कारण स्पष्ट होणे शक्य नाही त्यामुळे आता जरी पोलीस कोणाचा शोध लागल्याच्या दावा करत असले तरी जोपर्यंत कोणी मिळून येत नाही तोपर्यंत तरी हा दावा फुल ठरण्याची शक्यता अधिक आहे करमाळा पोलिसांच्या आवाक्याबाहेर विषय असल्यास त्यांनी हा विषय सोलापूर येथील पथकाकडे द्यावा अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत

केतुर गावासह परिसरातील गावातील संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे. घटनेची माहिती घेत असताना अनैतिक संबंधाच्या संशयातून सदरचा खून झाला असल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने शोध सुरू आहे. तर या प्रकरणातील आरोप आरोपी ही निष्पन्न होतील. दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी करमाळा पोलिसांचे एक पथक रवाना केले आहे. लवकरच गुन्हेगार हाती लागतील.
– सुर्यकांत कोकणे,
पोलिस निरिक्षक, करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE