करमाळ्यात ५१ पैकी दोन ग्रामपंचायतीसह ४६ उमेदवार बिनविरोध
करमाळा समाचार
आज माघार घेण्याच्या एकमेव दिवशी तब्बल 540 जणांनी माघार घेतल्यामुळे 51 गावातून 46 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर जेऊरवाडी सह सालसे येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे दिसुन येत आहे. तर आता 50 ग्रामपंचायतीत 861 उमेदवार लढताना दिसतील.

करमाळा तालुक्यात एकूण 51 ग्रामपंचायतीसाठी तब्बल चौदाशे सत्तेचाळीस अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये तेवीस अवैध ठरल्याने 1424 अर्ज अबाधित राहिले होते. त्यानंतर आज माघार घेण्याच्या एकमेव दिवशी 540 जणांनी माघार घेतली. त्यामध्ये 46 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर जेऊरवाडी गावचे फक्त सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर जेऊरवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यात जमात होती. त्यानंतर आता सालसेत फक्त नऊ उमेदवार शिल्लक राहिल्याने या ठिकाणची ही ग्रामपंचायत बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे.

बिनविरोध निवडून आलेले सदस्य ची गावे खालील प्रमाणे
पांडे 1, दिलमेश्वर 1, कुगाव 7, बिटरगाव 2, पाथर्डी 1, सालसे 9, नेरले 2, रोशेवाडी 2, पोटेगाव 5, मांगी 1, गुळसडी 1, सरपडोह 5, आळसुंदे 2, जेऊरवाडी 7